वेब स्टोरी

ई-पेपर

लॉग इन करें

घरफोडी करणारा भामटा जेरबंद.

पुणे : प्रतिनिधी :बाणेर पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्रात दि.८रोजी सकाळी सुमा. लेन नं १विरभद्रनगर,बाणेर पूणे येथील फिर्यादी यांचे राहत्या घराचा दरवाजा कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या परवानगी शिवाय चोरीच्या उद्देशाने कशाच्यातरी सहाय्याने त घरात प्रवेश करुन फिर्यादीच्या घरातील लोखंडी कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे मंगळसूत्र व 50,000 -रोख रक्कम लुबाडीच्या इरादयाने चोरुन नेल्याने बाणेर पोलीस स्टेशन गुन्हा २०८/२०२५ भा.न्या.सं.क. ३३१(३),३०५(अ), ३(५) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर दाखल गुन्हयातील आरोपीचा बाणेर तपास पथकातील पोलीस अधिकारी व पो अंमलदार यांनी ‘ गोपनीय बातमीदारामार्फत, सीसीटीव्ही फुटेज चेक करुन काळेवाडी पिंपरी चिंचवड येथुन आरोपी साहील वाघमारे वय २३ वर्ष रा. हरदेव कॉलनी विजयन काळेवाडी पुणे शाकिब छोटू शेख वय २६ वर्ष रा. संजय गांधीनगर काळे ब्रिजजवळ, गुप्ता किराणा स्टेाअर्स जवळ पुणे यांना अटक करुन आरोपीच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली स्पेंल्डर मोटार सायकल व तसेच चोरी केलेल्या रक्कमेपैकी 38,000 रु.रोख जप्त करुन गुन्ह्यातील मुख्य आरोपी नामे चेतन उफ चेत्या काकासाहेब वाघमारे, वय-२७ वर्षे, रा.विजयनगर,.अल्फान्सो शाळेसमोर, माया मार्केटजवळ ,साई गोटा, काळेवाडी, पुणे रोजी नमुद गुन्ह्यात अटक करुन सदर गुन्ह्यामध्ये चोरीस ‘केलेले सोन्याचे मंगळसुत्र जप्त करुन गुन्हा उघडकींस आणलेला आहे. अटक आरोपी क्र ३हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्याचेविरुध्द विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त.पश्चिम प्रादेशिक विभाग .मनोज पाटील, पोलीस ‘ उप-आयुक्त, परि४ सोमय ‘ मुंडे,’सहा.पोलीस आयुक्त ‘ खडकी विठल दबडे यांचे सुचने व मार्गदर्शनाखाली बाणेर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे). अलका सरग, सपोनि कैलास डाबेराव .सपोनि गणेश रायकर , पोउपनि दिपाली पाटील. पोलीस अंमलदार बाबा आहेर. किसन शिंगे, गणेश गायकवाड ,निकाळजे अतुल इंगळे, गजानन अवातिरक, प्रदिप खरात, प्रितम निकाळजे, शरद राऊत, राहंत पाथरुट, मराठे यांनी केली आहे

Majha News 24
Author: Majha News 24

Leave a Comment

और पढ़ें
और पढ़ें