शक्तीचा जागर : पुण्यात ‘TFS फेमिनास्टार’तर्फे ‘२१ पॉवरफुल विमेन’ मेगा फॅशन शो
पुणे : प्रतिनिधी
पुणे शहरात महिला सक्षमीकरण, आत्मविश्वास आणि ग्लॅमरचा संगम अनुभवायला मिळाला. TFS फेमिनास्टार प्रा. लि. तर्फे ‘स्टोरीज ऑफ २१ पॉवरफुल विमेन’ या संकल्पनेवर आधारित भव्य फॅशन शोचे आयोजन २१ डिसेंबर रोजी इंद्रिया , बंड गार्डन येथे करण्यात आले.
या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २१ महिलांना व्यावसायिकरित्या कोरिओग्राफ केलेल्या रॅम्प वॉकसह हाय-एंड मॅगझिन फोटोशूटच्या माध्यमातून सन्मानित करण्यात आले. प्रत्येक महिलेचा संघर्ष, यशाचा प्रवास आणि आंतरिक शक्ती प्रभावीपणे मांडण्यात आली.
महिलांना स्वतःचे अनुभव मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि समाजाला प्रेरणा देणे, या उद्देशाने TFS फेमिनास्टारच्या संस्थापक व आयोजिका रश्मी अभिषेक यांनी या उपक्रमाची संकल्पना साकारली. आयोजक भागीदार डॉ. रश्मी जैन आणि सपना रंगेरा यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
आदित्य बिर्ला ब्रँड ज्वेलरी असलेल्या इंद्रिया यांनी ज्वेलरी पार्टनर म्हणून सहभाग नोंदवला. कार्यक्रमासाठी श्री स्वरूप रॉय आणि रिया चौहान यांनी विशेष सहकार्य केले.
रनवे डायरेक्टर अंकित पारेख यांच्या मार्गदर्शनाखाली रॅम्प वॉक आकर्षक ठरला. ग्रूमर रेणू राघव यांनी सहभागी महिलांचा आत्मविश्वास खुलवला. सूत्रसंचालन प्रिती कोचर यांनी प्रभावीपणे केले.
या सोहळ्याला प्रसिद्ध उद्योजक राज राजपूत, मिसेस इंडिया गॅलेक्सी पूर्वा श्रीवास्तव, झी मराठीचे अभिनेता विनायक काळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मेकअप पार्टनर्स नुसरत व टीम, आरती पालांडे, काव्या ब्युटी सलून, अमृता मेकअप आर्टिस्ट; फॅशन पार्टनर्स गणपती साडी, गौरीश फॅशन; तर फोटोग्राफी पार्टनर्स योगेश जाधव पाटील व टीम, ऋषी पाटील व टीम यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.
डॉ. रश्मिरेखा शाह, सीमा राजपूत, मृणालिनी कांबळे, साहिबा (ड्रेडलॉक आर्टिस्ट), आरती वाघुले, काजल माने, काजल शेवाळे, सुप्रिया तरटे यांनी रॅम्पवर विशेष ठसा उमटवला.
‘२१ पॉवरफुल विमेन’ हा केवळ फॅशन शो नसून, महिलांच्या धैर्य, जिद्द आणि आत्मविश्वासाचा उत्सव ठरला. महिलांच्या सामर्थ्याचा जागर घडवून आणणारा हा उपक्रम उपस्थितांना प्रेरणादायी ठरला.





