खुनाच्या प्रयत्नात असलेल्या विधीसंघर्षित बालकांना ताब्यात 
पुणे: प्रतिनिधी.. दि 17 रोजी, वरिष्ठांच्या आदेशानुसार सणांच्या पार्श्वभूमीवर पोलीस युनिट-6 कडून पेट्रोलिंग सुरू होते. त्यावेळी एका ॲक्टिव्हा गाडीवर चार संशयित बालक दिसली.
पोलीसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता, त्यापैकी दोन जण पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले. तपासादरम्यान:
त्यांच्या जवळून ३ धारदार शस्त्रं आणि १ गिलावर लोखंडी शस्त्र) सापडले.
गुन्हा करण्यासाठी वापरलेली ॲक्टिव्हा गाडी जप्त करण्यात आली.
एकूण जप्त मालाची किंमत अंदाजे ₹81,050 आहे
चौकशीत उघड: या चारही विधीसंघर्षित बालकांपैकी एकाच्या भावाला 15 दिवसांपूर्वी मारहाण झाली होती. त्याचा बदला घेण्यासाठी त्यांनी कट रचून खून करण्याचा प्रयत्न केला होता.
या प्रकरणी संबंधित बालकांविरुद्ध
भा.न्या.सं. कलमे 55, 61, 3(5)
आर्म्स ॲक्ट कलम 4(25)
महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1), 135
अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.





