चारचाकी पिकअप चोरी करणा-या आरोपीस अटक करुन एकुण 14,9,000|- रु.चा मुद्देमाल केला जप्त.
पुणे: प्रतिनिधी
दि.19 रोजी पर्वती पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 397/2025२ भा.न्या.सं.क. ३०३(२) प्रमाणे दाखल गुन्हयातील फिर्यादी त्यांचे ताब्यातील पिकअप 9,00,000 रु. किं.चा व त्यामध्ये 5,29,000 रु किं.च्या “इलेक्ट्रोनिक वस्तु असणा-या मुदेमाला सह एकुण 14,29,000- रु. किं.चा मुदेमाल एका अज्ञात चोरटयाने चोरी केले बाबत गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.
सदर गन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड व पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अनिता हिवरकर’ यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रभमारी अधिकारी .किरण पवार’व तपास पथकातील पोलीस अंमलदार करत असताना पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, महेश मंडलिक, स्वप्निल घगे यांना मिळालेल्या गोपनिय ‘ बातमीवरुन सापाळा आरोपी शिवा मिट्ठलाल यादव, वय 20 वर्षे, रा. काळबाई मंदिराजवळ , वरद अपार्टमेंट , जाधव वस्ती चिखली पणे. यास अत्यंत शिताफीने पकडुन त्यास दाखल गुन्हयात अटक करण्यात आले असुन त्याचे ताब्यातुन एम महिड्रा पिकअप व इलेक्ट्रोनिक वस्तुचे बॉक्स असा एकुण 14,09,000 रु.किंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .
कामगिरी .अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, मा.पोलीस उप-आयुक्त परि-2 . मिलिंद मोहिते, मा.सहा.पोलीस आयुक्त .धन्यकुमार गोडसे यांवे मार्गदर्शनाखाली .वरिष्ठ पोलीस निरीक्षक .नंदकुमार गायकवाड, .पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिता हिवरकर सहा.पोलीस निरी, . राहुल नामद यांचे सुचनेप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक श्री.किरण पवार, पोलीस अंमलदार ‘ सदाशिव कोपनर, प्रकाश मरगजे.प्रविण जगताप महेश मंडलिक,स्वज्निल घुगे,सुर्या जाधव, सद्दाम शेख, मनोज बनसाड, अमाल दबडे, अमित चिव्हे, नाना सोखाडे, राकेश सुर्वेव किर्ती भोसले यांनी केली,





