वेब स्टोरी

ई-पेपर

लॉग इन करें

स्वतः चा नावाच्या दहशतीसाठी तोडफोड करणाऱ्या फरार आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

पुणे: प्रतिनिधी:येरवडा पोलीस स्टेशन गु.र.नं.७०६/२०२५ सह भारतीय हत्यार कायदा ४(२५) क्रिमीनल लॉ अमेंडमेंट ३. ७ अन्वये गुन्हा दाखल झाला होता. दाखल गन्ह्यातील आरोपी येरवडा ‘ पोलीस स्टेशन रेकार्डवरील असून यापुर्वी एमपीडीए, मकोका अंतर्गत कारवाई ‘होऊन जामीनावर बाहेर आला होता. जामीनावर बाहेर आल्यानंतर येरवडा परीसरात तोडफोड करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. सदर घटनेची दखल घेवून गुन्हा दाखल करुन आरोपींचा शोध सुरु केला असताना.सदर प्रकरणी आरोपीना तात्काळ ताब्यात घेणेबाबत वरीष्ठांनी सुचना दिल्या होत्या.
सदर अनुषंगाने वरीष्ठ पोलीस निरीक्षक . अंजुम बागवान यांचे मार्गदर्शनाखाली येरवडा पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोलीस अंमलदार अमोल गायकवाड यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की दाखल गुन्ह्यातील आरोपी हा पवार वस्ती, लोहगाव भागात त्याच्या मित्राकडे येणार असलेबाबत खात्रीलायक माहिती प्राप्त झाल्याने तपास पथका चे प्रभारी पोलीस उप निरीक्षक महेश फटांगरे पोलीस अंमलदार शैलेश वाबळे, नटराज सतार, अमोल गायकवाड यांनी मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन सापळा रचुन सदर आरोपी हा त्याठिकाणी आल्यानंतर त्यास ताब्यात घेवृन त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव समीर शब्बीर शेख, वय-२७, रा-जयजवाननगर, येरवडा, पुणे असे असल्याचे सांगितले. सदरचा गन्हा हा स्वःतच्या नावाची दहशत करण्यासाठी तसेच फिर्यादी यांचेसोबत जुन्या भांडणाच्या रागातुन केल्याचे सांगितले
ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त,मनोज पाटील, .पोलीस उपायुक्त, परिमंडळ 4
सोमय मुंडे, मा.सहा पोलीस आयुक्त, येरवडा प्रांजली सोनवणे, पोलीस निरीक्षक, येरवडा अंजुमन बागवान, पोलीस निरीक्षक (गुन्हे). विजय ठाकर, यांचे मार्गदशनाखाली तपास पथकाचे प्रभारी पोलीस उप निरीक्षक महेश फटांगरे, पोउनि प्रदिप सुवे, पोलीस अंमलदार महेश शिंदे, मुकुंद कोकणे, शैलेश वाबळे, बालाजी सोगे, भीमराव कांबळे, नटराज सुतार अतुल जाधव, अक्षय रिंदे, अमोल गायकवाड, संदीप जायभाय यांनी केलेली आहे

Majha News 24
Author: Majha News 24

Leave a Comment

और पढ़ें
और पढ़ें