वेब स्टोरी

ई-पेपर

लॉग इन करें

दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या सहा जणांच्या रांजणगाव एम आय डिसि पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

दरोडयाचे तयारीतील सहा आरोपीं रांजणगाव एमा डी सि पोलिसांच्या जाळ्यात.
पुणे ग्रामीण :वार्ताहार दि 9 रोजी रात्री 11.00 वाजता डायल 112 वरती कॉलर यांनी फोन करुन कळविले की. “बंद पडलेल्या एका कंपनीमध्ये काही चोर घुसले आहेत. त्यांच्या जवळ दांडे आणि टिकाव आहेत. तरी पोलीस मदत हवी आहे, असा कॉल कंट्रोल् ला आला, कर्तव्यावरील पोलिस.संतोष आडसुक यांनी सदरची माहिती पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना सांगीतली असता त्यांनी घटनेचे गांभीर्य ‘ओळखत तपास पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना तात्काळ सदर घटनास्थळी जावुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या होत्या त्यानुसार तपास पथकातील अविनाश थोरात, सहा.फौज. दत्तात्रय शिंदे, पोलिस . विलास आंबेकर, पो.काँ उमेश कुतवळ यांनी सदर ठिकाणी तात्काळ भेट दिली
सिक्यूरीटीगार्ड यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगीतले की, थोड्या ‘वेळापर्वी कंपनी जवळुन गुजरात पासिंगची गाडीतील संशयीत इसम कंपनीमध्ये चोरीच्या उदेशाने आले होते. परंतु मला पाहुन त्यांचेकडील गाडीमधुन पळून गेले असल्याचे सांगीतले. सदर संशय़ीत इसमांचा पोलीस पथकाने खाजगी वाहनातुन शोध घेत असतांना खंडाळामाथा येथे नगर-पुणे हायवे रोडलगतच्या एका हॉँटेल समोर रोडवर गुजरात पासिंगची व्हँगनर गाडीमध्ये संशयीत इसम पोलीसांना ‘ पळुन जाण्याचा प्रयत्न करु लागले. पथकाने शिताफिने संशयीत इसमांना ताब्यात घेतले. सदर इसमांकडे कसून चौकशी केली असता त्यांनी त्यांचे नाव, स्रेशभाई प्रभ्भाई धामेचा, जितंद्र दिनेश डाभी, मेह्ल सरेशभाई धामेचा, भरतभाई देवजीभाई सोळंकी, उत्सव जितेद्रभाई डाभी, भरतभाई जिवराजभाई कोळी सर्व राहणार मोरबी-2 इंदिरानगर, थाना-बी.डिव्हिजन,ता.जि.मोरबी,गुजरात असे असल्याचे सांगीतले. त्यांच्याकडील मोबाइ लची पाहणी केली असता भरत देवजीभाई सोलंकी याच्याकडील मोबाईल मध्ये बंद पडलेल्या एका कंपनीचे फोटो मिळून आले. त्यांचेकडील व्हँगनर गाडीची दोन पंचासमक्ष पहाणी केली असता गाडीमध्ये चोरीसाठीचे साहित्य व हत्यारे मिळून आले आहेत.
सदर संशयीत आरोपींकडे कौशल्यपुर्वक चौकशी केली असता सदर आरोपी हे MIDC मधील एक बंद पडलेल्या कंपनीमधील स्क्रॅप व मातीमध्ये मौल्यवान धातु मिळत असल्याच्या सशयावरुन चोरी करण्याचे हेतुने आलो असल्याची कबुली दिली सदर प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडुन व्हॅगनर गाडी क्र. GJ 36 L 5891, दरोडा चोरीसाठी लागणारे साहित्य टिकाव, लोखंडी टोकदार चाकु, इतर साहित्य व सहा मोबाईल असा एकुण 3,.40,000रु. किंमतीचा मुदेमाल जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या ‘ आरोपींविरुध्द दरोडा चोरीचे तयारीमध्ये मिळुन आले प्रकरणी गुन्हा दाखल कऱण्यात आला ‘आहे सदर आरोपींना अटक करण्यात आली असता न्यायदंडाधिकारी शिरुर कोर्टाने दि 12 पर्यंत पोलीस कस्टडी दिली.

Majha News 24
Author: Majha News 24

Leave a Comment

और पढ़ें
और पढ़ें