वेब स्टोरी

ई-पेपर

लॉग इन करें

सिग्नल आणि गर्दीच्या ठिकाणी जबरी चोरी करणाऱ्या टक टक ग्यांग गजआड.

सिग्नल व गर्दीच्या ठिकाणी चारचाकी गाडीला धडक लागल्याचे सांगून गाडीतील मोबाईल, वस्तू जबरदस्तीने चोरणाऱ्या  ‘टक-टक’ टोळीचा पर्दाफाश.

पुणे:प्रतिनिधी.
फरासखाना पोलीस स्टेशन गु.र.नं. 31/2026 भारतीय न्याय संहिता कलम प्रमाणे दाखल गुन्ह्यातील अनोळखी आरोपींचा शोध घेण्याबाबत वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट-1, पुणे शहर येथील पोलीस अंमलदार जमदाडे, पेरणे, भोसले आदींनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली होती.
तपासादरम्यान दोन संशयित इसमांचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार मयूर भोसले, अमित जमदाडे व हेमंत पेरणे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, संबंधित संशयित इसम समर्थ पोलीस स्टेशन हद्दीतील एका लॉजमध्ये येणार आहेत.
ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अजित जाधव यांना कळविण्यात आले. त्यानंतर त्यांनी स्वतः व पथकासह लॉज परिसरात सापळा रचून दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी आपली नावे
रवी ओमप्रकाश कोहली (वय 38 वर्षे), रा. मेरठ, उत्तर प्रदेश
अफजल कय्यूम अब्बासी (वय 38 वर्षे), रा. मेरठ, उत्तर प्रदेश
अशी असल्याचे सांगितले.
फरासखाना पोलीस स्टेशन गु.र.नं. 31/2026 मधील गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पुढील तपासात त्यांनी पुणे शहरात यापूर्वीही अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे सांगितले.
दिनांक 11 रोजी सायंकाळी कर्वे रोड, कोथरूड येथील सारस्वत बँकेसमोर उभ्या असलेल्या एका चारचाकी गाडीच्या ड्रायव्हर सीटजवळून हात घालून त्यांनी अॅपल कंपनीचा आयफोन 17 प्रो व एक पांढऱ्या रंगाचे पाकीट चोरल्याचे उघड झाले. याबाबत अलंकार पोलीस स्टेशन गु.र.नं. 27/2026 भारतीय न्याय संहिता कलम  गुन्हा दाखल आहे.
तसेच दिनांक 19 रोजी विमाननगर चौक परिसरात एका स्विफ्ट कार चालकाला गाडी पंक्चर झाल्याचा बहाणा करून त्याच्या गाडीतून सॅमसंग कंपनीचा मोबाईल व वनप्लस कंपनीचा मोबाईल चोरल्याचेही तपासात समोर आले आहे. या प्रकरणी विमानतळ पोलीस स्टेशन गु.र.नं. 413/2025 भारतीय न्याय संहिता कलम  प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदर आरोपी हे सिग्नल व गर्दीच्या ठिकाणी वाहनाला हलकी धडक लागल्याचा बहाणा करून चालकाचे लक्ष विचलित करतात आणि गाडीतील मोबाईल, पाकीट व इतर मौल्यवान वस्तू चोरण्याची पद्धत वापरत असल्याचे तपासात निष्पन्न झाले कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, . सह पोलीस आयुक्त  रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, पंकज देशमुख,  पोलीस उपायुक्त (गुन्हे)  निखिल पिंगळे,. सहा पोलीस आयुक्त   शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
ही कारवाई पोलीस निरीक्षक अजित जाधव, पोलीस अंमलदार मयूर भोसले, अमित जमदाडे, हेमंत पेरणे, अनिकेत बाबर, निलेश साबळे, शशिकांत दरेकर, संदेश काकडे, महिला पोलीस अंमलदार ज्योती मुलका तसेच चालक पोलीस अंमलदार प्रफुल्ल शेलार यांनी केली.

Majha News 24
Author: Majha News 24

Leave a Comment

और पढ़ें
और पढ़ें