वेब स्टोरी

ई-पेपर

लॉग इन करें

घरफोडी उघडकिस आणून आरोपीस मुंबई येथून ठोकल्या बेड्या.

पुणे :संमती को-ऑपरेटिव्ह सोसायटी, आगरकरनगर पणे येथे अज्ञात इसमाने घरफोडी चोरी केलेबाबत बंडगार्डन पोलीस स्टेशन पूणे येथे गु.र.नं. ३४६। २०२५ भा.न्या.सं.क. ३०५, ३३१, (२)(४) अन्वये दाखल झाला होता.
सदर गुन्हयाचा तपास पोलीस उप-आयुक्त गुन्हे निखिल पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ कडील प्रभारी अधिकारी संतोष सोनवणे, सहा.पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप-निरीक्षक आदलिंग व पोलीस अंमलदार तसेच एडि एस १ पथक प्रभारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय बागवे व पोलीस अंमलदार असे करीत असताना सी.सी.टि.व्ही फुटेजमध्ये संशयित इसम आढळून आला नमुद इसमाचा सी.सी.टि.्ही फुटेजवरुन पुढे शोध घेत असताना सदर इसम हा पुणे रेल्वेस्टेशन येथून कॅबने मुंबईकडे जाताना दिसून आला. अधिक तपास केला असता तो मुंबई चेंब्र येथे उतरल्याची माहिती प्राप्त झाली
गुन्हे शाखा युनिट २ कडील सहा.पोलीस निरीक्षक अमोल रसाळ यांना कॅब चालकाने दिलेल्या माहितीवरुन त्यांनी सदर इसमाबाबत अधिक माहिती घेतली असता तो मुंबई वाकोला पोलीस स्टेशनचे हद्दीत असलेबाबत माहिती प्राप्त झाली
गन्हे शाखेकडील वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक आदलिंग हे पोलीस अंमलदार यांचे पथक मुंबई येथे गेले असता वाकोला पोलीस स्टेशन, मुंबई येथून स्थानिक पोलीस मदत घेवन नमद घरफोडी करणारा आरोपी नामे राजकिरण अनिल जाधव वय २५ वर्ष रा.सांताकरुज पुर्व मुंबई यांस ताब्यात घेवुन सदर गुन्हा उघडकीस आणला आहे. सदर गुन्हयात नमुद आरोपीस दि.१५/9१/२०२५ रोजी अटक करण्यात आली आहे. बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे अधिक तपास चालु आहे. सदर आरोपी हा रेकार्डवरील गुन्हेगार असून त्याचेवर महाराष्ट्र व आंध्रप्रदेश मध्ये घरफोडीचे अनेक गन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हेश्ीपंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे निखील पिंगळे, मा.सहा.पोलीस आयुक्त श्री.विजय कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली युनिट २चे वरिष्ठ ‘ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, एडि एस १ चे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बागवे तसेच सहा.पोलीस निरीक्षक कवठेकर , सहा.पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप-निरीक्षक आदलिंग पोलीस अंमलदार कुंभार, चव्हाण, तांबोळी थोरात, राठोड, शिंदे, लोखंडे, जाधव, मोकाशी, टकले पवार, राख सरगर, मांढरे, नेवसे, ताम्हाणे, दळवी, आबनावे, शेख व वगारे असे गुन्हे शाखा युनिट २व एडी एस 9 पथकाने केली आहे
<

Majha News 24
Author: Majha News 24

Leave a Comment

और पढ़ें
और पढ़ें