वेब स्टोरी

ई-पेपर

लॉग इन करें

गहाळ जहालेले मोबाईल पोलीस उपआयुक्ताच्या हस्ते नागरिकांना परत देण्यात आले.

पुणे : प्रतिनिधी:हरवलेलं गहाळ झालेले ११९ मोबाईल फोन त्यांच्या मुळ मालकांना केले परत
दिनांक २१.रोजी पोलीस उप-आयूक्त परिमंडळ-५ यांच्या वतीने हरविलेले आणि गहाळ झालेले मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत देण्याचा उपक्रमा अंतर्गत नेताजी मंगल कार्यालय, हडपसर या ठिकाणी उत्साहात आणि भावनिक वातावरणात कार्यक्रम पार पाडला. हा उपक्रम नागरिक आणि पोलीस दल यांच्यातील विश्वासाची कडी निर्माण करणारा ठरला
कार्यक्रमाची प्रस्तावना पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन संजय मोगले यांनी केली . त्यानंतर पोलीस उप आयक्त, राजकुमार र शिंदे, यांनी सी.ई.आय.आर प्रणाली कशी कार्य करते, हरवलेले मोबाईल शोधण्यासाठी पोलीसांकड़्न वापर केल्या जाणा-या तांत्रिक पध्दतींचा वापर याबाबत सर्वसमावेशक माहिती दिली तसेच यांच्या हस्ते 171मोबाईल परत करण्यात आले. त्यामध्ये हडपसर पोलीस स्टेशन कडील 119 मोबाईल यांचा समावेश होता.
कामगिरी ही अपर पोलीस आयुक्त, पुणे मनोज पाटील,.पोलीस उप-आयूक्त, डॉ.राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर अनुराधा उदमले, सहा.पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, नम्रता देसाई यांचे मागदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस स्टेशन, संजय मोगले, पोनि. (गुन्हे), निलेश जगदाळे यांचे सूचना प्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप-निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, सायबर विभागाचे पोलीस उप-निरीक्षक अल्ताफ शेख पोलीस अंमलदार संदीप राठोड, बाप् लोणकर, माधूरी डोके , सोनाली कुंभार, विक्रम भोर, समीर पांडुळे प्रकाश सावंत, सुनिल आव्हाड, स्वप्नील भुजबळ, तुकाराम झुंजार, अमोल दणके व महाविर लोंढे या पथकानि केली.

Majha News 24
Author: Majha News 24

Leave a Comment

और पढ़ें
और पढ़ें