वेब स्टोरी

ई-पेपर

लॉग इन करें

जिजाऊ महिला प्रतिष्टान तर्फ न्यू होममिनिस्टर कार्यक्रम आयोजित.

पिंपरी चिंचवड : प्रभाग क्रमांक 22 मधील खास माता बहिणीसाठी जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथदादा नढे सोशल फाउंडेशन आयोजित न्यू होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा गप्पा, गोष्टी, रंजकखेळ, सोबतच कॉमेडीचा बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमांमध्ये प्रथम क्रमांक ई बाईक व मानाची पैठणी, द्वितीय क्रमांक फ्रिज, तृतीय क्रमांक 43 इंची टीव्ही, चतुर्थ क्रमांक वाशिंग मशीन, पाचवा क्रमांक मिक्सर , प्रश्नमंजुषा अंतर्गत आकर्षक बक्षिसे आणि लकी ड्रॉ विजेत्यास सोन्याची नथ व सहभागी प्रत्येक स्पर्धक महिलेस आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत या कार्यक्रमाचे सादर करते पूजाताई काळभोर सिने अभिनेत्री हे करणार आहेत.
या कार्यक्रमाचे आयोजन शनिवार दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी वेळ सायं. 5 वाजता स्थळ विष्णुराज मंगल कार्यालय ज्योतिबा नगर काळेवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे.
प्रभाग क्रमांक 22 मधील सर्व महिला भगिनींनी न्यू होम मिनिस्टर या कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित रहावे आणि या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन गप्पा, गोष्टी, मनोरंजन , खेळ, आकर्षक बक्षीस जिंकून या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा व सदर कार्यक्रमाचे फॉर्म जमा करण्याचे ठिकाण सौ. मोनिका नवनाथदादा नढे पाटील जनसंपर्क कार्यालय काळेवाडी, विष्णूराज मंगल कार्यालय शेजारी, मनपा शाळेसमोर, ज्योतिबानगर काळेवाडी येथे जमा करावे व मोठ्या संख्येने प्रभागातील महिला भगिनींनी या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक सौ. मोनिका नवनाथ दादा नढे पाटील यांनी केले आहे

Majha News 24
Author: Majha News 24

Leave a Comment

और पढ़ें
और पढ़ें