वेब स्टोरी

ई-पेपर

लॉग इन करें

महिलांची छेड काडून 1 वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस अटक.

महिलांची छेडछाड करुन विनयभंग करणा-या व 1 वर्षापासुन पोलीसांना गंगारा देणा-या आरोपीस केले जेरबंद
पुणे: प्रतिनिधी:
विमानतळ ‘ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गणेश पार्क., लोहगांव, पणे येथे दचाकीवर ‘ येवुन एक अज्ञात इसमाने अल्पवयीन पिडीतेचा विनयभंग केल्याने विमानतळ ‘ पोलीस स्टेशन येथे ग.र.नं ६२४१२०२५, भा.न्या.सं.क. ७४,७५ सह लैंगिक अपराधांपासन बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८,9२ प्रमाणे गन्हा दाखल झाला होता. विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये यापूर्वीही अश प्रकारचे गुन्हे दाखल झाले होते. सदरबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.गोविंद जाधव यांनी आरोपीचा तात्काळ शोध घेणेबाबत आदेशित केले होते
सदर गन्हयाच्या अनषंगाने तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी अज्ञात आरोपींचा शोध सूरु केला होता. त्याप्रमाणे पोलीस अंमलदार योगेश थोपटे, ज्ञानदेव आवारी, लालू क-हे, राहल जोशी यांनी घटनास्थळा वरील व आजुबाजुचे आरोपीचे मार्गावरील विमाननगर, विश्रांतवाडी, दिघी, भोसरी या भागातील तब्बल २४५ सी.सी.टी.व्ही फटेजची पाहणी करुन यातील आरोपी नामे सागर राम सोनवणे वय २२ वर्षे रा. हनमान कॉलनी ६ नंबर , सर्हे नंबर १८६, शास्त्री चौक रोड, भोसरी, पुणे याचा शोध घेवन त्यास शिताफिने सापळा लावन ताब्यात घेतले. नमद आरोपी याचेकडील तपासामध्ये आरोपी याने विमानतळ पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये एकण 5 विनयभंगाचे गन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. अन्य पोलीस स्टेशन हद्दीतही त्याने गन्हे केल्याची कबूली दिली आहे. सदर आरोपी हा रात्रीचे वेळी सुनसान रस्त्यावर महिलांची छेडछाड करुन मोटार सायकलवरुन पळन जायचा व सी.सी.टी.्ही. मध्ये येणार नाही याची काळजी घ्यायचा. नमूद आरोपीस सदर गून्हयामध्ये दि.०७/१२/२०२५ रोजी अटक करण्यात आली आहे
सदरची कारवाई अपर पोलीस आयुक्त, विभाग, पूणे .मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त परि ४ सोमय मुंडे, मा.सहाय्यक पोलीस आयुक्त, येरवडा प्रांजली सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक (गन्हे) शरद शेळके यांचे सूचनांप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक नितीन राठोड.. पोलीस उप-निरीक्षक मनोज बरुरे. पोलीस अंमलदार योगेश थोपटे, ज्ञानदेव आवारी, लाल क-हे, राहल जोशी, रुपेश पिसाळ, शैलेश नाईक,राकेश चांदेकर, अंकश जोगदंडे, गणेश इथापे दादासाहेब बर्डे, सागर कासार, पांड्रग म्हस्के , सना शेख व आसमा शेख यांचे पथकाने केली आहे

Majha News 24
Author: Majha News 24

Leave a Comment

और पढ़ें
और पढ़ें